आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बालगट कराटे स्पर्धा:पिंपरी चिंचवड संघाला विजेतेपद, नागपूर शहर उपविजेता, यजमान औरंगाबाद संघ तिसऱ्यास्थानी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेने आयोजित बालगट राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. नागपूर शहर संघ उपविजेता ठरला. यजमान औरंगाबादच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत 32 जिल्ह्यातील 700 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची 3 व 4 डिसेंबरदरम्यान तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, सचिव संदीप गाडे, खजिनदार संदीप वाघचौरे, सदस्य नासेर शेख, औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, अ‍ॅड. रेणुका घुले, शहर अध्यक्ष अरुण भोसले, सचिव मुकेश बनकर, जिल्हा अध्यक्ष कैलास जाधव, सचिव बळीराम राठोड यांची उपस्थिती होती.

विजयी खेळाडू पुढील प्रमाणे आहेत

प्रथम क्रमांक - शाश्वत मेहेर (नागपूर), स्वीकार्य शानवारे (वर्धा), ओम भराटे (औरंगाबाद), इनोश पवार (पिंपरी चिंचवड), श्रीअंश सातपुते (औरंगाबाद), ईशान ढेपे (सोलापूर), ईशान शेट्टी (पालघर), उमर खान (पुणे), प्रणय जंजाळे (औरंगाबाद), समर्थ शहाणे (औरंगाबाद), स्पर्श वर्मा (सोलापूर), अनुज नारकर (मुंबई). प्रसाद राठोड (पुणे), हिमांशू जावळे (पिंपरी चिंचवड), यथार्थ धिवरे (ठाणे ग्रामीण), भाविक ढोक (मुंबई ), युगंक बुचंदे, मयंक ठोंबरे (पिंपरी चिंचवड), आदित्य झाडे (नागपूर), अथर्व जाधव (औरंगाबाद), देवांशू काखे (वर्धा), अनिश पाटील (पिंपरी चिंचवड).

प्रथम क्रमांक मुली - मीराया गुप्ता (ठाणे), पुष्टी जोगी (पालघर), अक्षरा थोरात (औरंगाबाद), सोजल काळे (पिंपरी-चिंचवड), पहेल दबडे (नागपूर), अनुष्का परदेसी (पिंपरी चिंचवड), वेदिका सोळुंके (अमरावती), स्वराली माने (सातारा), वैष्णवी सोलापुरे (पुणे), अवंतिका वासनिक (भंडारा), प्राची तारू (औरंगाबाद ), कोमल लोहकरे (नागपूर), जिया कोताम (मुंबई), आर्या सावंत (पालघर).

बातम्या आणखी आहेत...