आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा:अहमदनगर, सोलापूर, पुणे संघाची विजयी आगेकुच, नाशिक संघाचा पराभव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदपूर (लातूर) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ३३ व्या महाराष्ट्र राज्य किशोर-किशोरी कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात किशोर गटात अहमदनगर, मुंबई शहर व मुलींच्या गटात सोलापूरच्या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.

किशोर गटात मुंबई शहर संघाने सांगली संघावर ५८-२८ असा दणदणीत विजय मिळवला. मध्यंतराला मुंबई शहराकडे २३-१४ अशी आघाडी होती. मुंबई शहरच्या अलोक गायकवाड, आर्यन बावडेकर यांनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर व शैलेश तरकसे याने भक्कम बचाव करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांगलीच्या शिवराज जगदाळेने केलेल्या चढायांच्या जोरावर व दर्शन जाधवने केलेल्या पकडीमुळे सामन्यात काही अंशी चुरस निर्माण झाली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या लढतीत अहमदनगर संघाने सिंधुदुर्ग संघावर ४३-२० असा विजय मिळवला. मध्यांतराला अहमदनगरकडे २८-९ अशी भक्कम आघाडी होती. नगकरच्या गणेश नरवडे यांने मैदान गाजवले. त्याला गौरव मोटकरने पकडी घेत चांगली साथ दिली. सिंधुदुर्गच्या बाळू तांबे व आकाश परब यांनी काहीसा प्रतिकार केला.

पुण्याकडून मुंबई शहर पराभूत

किशोर गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुणे संघाने मुंबई शहर संघावर ४०- ३३ अशा विजय मिळवला. मध्यंतराला पुणे संघाकडे २२-१९ अशी निसटती आघाडी होती. पुण्याच्या श्रावणी सावंत, आकांक्षा रेणूसे यांनी चौफेर हल्ला चढवत आक्रमक खेळ केला. तर सुजाता पवारने घेतलेल्या सुंदर पकडीच्या जोरावर विजय साकारला. मुंबई शहरच्या आदिती कविलकरने चांगली लढत दिली. मात्र त्यांचा पुण्याच्या आक्रमणाला थोपवता आले नाही. मुंबई उपनगर संघाने ठाणे संघावर ३२-२२ असा विजय मिळविला.

साेलापूरच्या तनिष्का, देवयानी चमकल्या

मुलींच्या दुसऱ्या सामन्यात सोलापूर संघाने अहमदनगर संघावर ६५-३७ अशी एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतराला सोलापूर संघ २४-२५ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर मात्र ही पिछाडी भरून काढत सोलापूर संघाने सामना आपल्या खिश्यात घातला. सोलापूरच्या तनिष्का बोरकर व देवयानी एडके यांची सुरेख खेल केला. तर प्राची चंदनकर व संस्कृती झेंडे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

स्पर्धेचे इतर निकाल

किशोर गट - कोल्हापूर वि. सातारा (३६-३०), हिंगोली वि.वि. उस्मानाबाद(६४-३४), जळगाव वि.वि. नांदेड(७५-२५), नंदुरबार वि.वि. जालना (५४-२६). मुली - सिंधुदुर्ग वि.वि. नांदेड (६६-८), कोल्हापूर वि.वि. नाशिक (३६-२०), परभणी वि.वि. बीड (५२-९).

बातम्या आणखी आहेत...