आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा:कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे संघाचा विजय, परभणीकडून औरंगाबादचा पराभव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानतर्फे आयोजित 49 व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गतविजेते कोल्हापूरसह पुणे, ठाणे, नाशिक संघांनी विजयी सलामी दिली. कुमारी गटातील साखळी सामन्यात यजमान परभणीने संघाने औरंगाबादचा पराभव करत विजयी सुरुवात केली.

गंगाखेड-परभणी येथील स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत सुरू झालेल्या अ गटात कोल्हापुरने मुंबई शहरचा प्रतिकार ३९-१६ असा मोडून काढत विजयी सलामी दिली. विश्रांतीला १८-११ अशी आघाडी घेणाऱ्या कोल्हापुरने विश्रांतीनंतर आक्रमक खेळ करीत हा सामना एकतर्फी केला. ओमकार पाटील, आदित्य पवार यांच्या झंजावाती चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. मुंबईचा विशाल लाड एकाकी लढला. ड गटात पुण्याने प्रणित काळे, पृथ्वीराज शिंदे, रोहित होडशीळ यांच्या झंजावाती खेळाच्या बळावर जालनाला ५४-२० असे नमवत पहिला विजय साकारला. जालनाचा ऋत्विक विधाते एकाकी लढला. क गटात ठाण्याने पालघरला ४२-३७ असे पराभूत केले. विघ्नेश पाटील, आफताब, यश भोईर ठाण्याकडून, तर पियुष पाटील पालघरकडून उत्कृष्ट खेळले.

पालघरने सोलापूरला हरवले

कुमारीच्या अ गटात गतविजेत्या पालघरने सोलापूरचा प्रतिकार २४-१८ असा मोडून काढला. मध्यांतरातील १०-१० अशा बरोबरीनंतर पालघरने ही किमया केली. ग्रीष्मा वनारसे, हर्षदा पाटील, वैष्णवा डांगे यांच्या उत्तरार्धातील चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सोलापूरच्या धनश्री तेली, ऋणाली जाधव यांनी कडवा प्रतिकार केला. क गटात मुंबई शहरने दुबळ्या सिंधुदुर्गला ५७-१७ असे सहज नमविले. रिद्धी हडकर, कादंबरी पेडणेकर यांच्या झंजावाती चढाया त्याला काशिष पाटीलची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विषय सोपा गेला. सिंधुदुर्गची प्रज्ञा शेटे बरी खेळली

इतर निकाल

कुमार गट - रत्नागिरी वि. वि. नांदेड (४४-१७), सांगली वि. वि. बीड (४९-२०), हिंगोली वि. वि. लातूर (४१-१६), नंदुरबार वि. वि. धुळे (३०-२१), मुंबई उपनगर वि. वि. नाशिक (३७-२९), मुंबई उपनगर वि. वि. नंदुरबार (३१-२३).

कुमारी गट - सांगली वि. वि. बीड (४९-२०), रायगड वि. वि. धुळे (३३-२९), परभणी वि. वि. औरंगाबाद (५३-११), नाशिक वि. वि. जालना (५२-१९).

बातम्या आणखी आहेत...