आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कराटे स्पर्धा:पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; समीक्षा, आरव, आदित्य, अंशुमनला सुवर्णपदक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या 43 व्या राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 16 पदके आपल्या खात्यात जमा केली. यात 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्यपदकांची पदकांची कमाई केली. या स्पर्धेत एकूण 28 जिल्ह्यातील 1527 खेळाडू काता व कुमिते प्रकारामध्ये सहभागी झाले होते. सुवर्णपदक विजेत्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

स्पर्धेत युवा राष्ट्रीय खेळाडू समिक्षा मांजरमेने 56 ते 59 वजन गटात पुणे, नागपूर व मुंबईच्या प्रतिस्पर्धीवर मात करीत सुवर्णपदक पटकावले. 6 वर्ष वयोगटात आरव मिरकरने काता व कुमिते प्रकारात सांगली, मुंबई उपनगर, गोंदियाच्या प्रतिस्पर्धीवर मात करत सुवर्णपदक जिंकले. आदित्य राठोडने 10 ते 12 वर्ष वयोगटात +45 वजन गटात जळगाव, सातारा, रायगड येथील प्रतिस्पर्धीवर मात करत सुवर्णपदक मिळवले. तसेच 8 ते 10 वर्ष वयोगटात अंशुमन मिरकरने अहमदनगर, बीड, मुंबईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करीत काता प्रकारात सुवर्ण आणि कुमिते प्रकारात कांस्य पदक पटकावले.

इतर विजेते खेळाडू

रौप्यपदक विजेते

युवराज जैस्वाल, विराज भालेकर, स्वानंदी कुलकर्णी, सृष्टी अकोलकर

कांस्यपदक विजेते

तनिष रिठे, आर्यन घुमरे, प्रथमेश पंडित, अंशुमन मिरकर, स्वानंदी कुलकर्णी, रोहिणी बनसोडे, ओजल सूर्यवंशी.

स्पर्धेत सहा जण पंच

या स्पर्धेत पंच म्हणून मनिष धावणे, सुमित जाधव, नरेंद्र संतान्से, रेखा मिरकर, दिपाली जाधव, रोहिणी बनसोडे आणि एरिना इन्चार्ज म्हणून अनिल मिरकर यांनी काम पाहिले. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अनिल मिरकर, संतोष भालेराव, प्रफुल्ल दांडगे, विश्वदिप गिऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटना अध्यक्ष मुरलीधर जगताप, तुकाराम मुंडे, जसवींदर कौर, आशा मुंडे यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...