आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय केन्पोकाई स्पर्धा:औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद, नाशिक उपविजेता तर परभणी तिसऱ्या स्थानी

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तिवारी मंगल कार्यालय येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल केन्पो काई स्पर्धेत 300 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत यजमान औरंगाबादच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 35 पदके पटकावत आपल्या संघाला सर्वाधारण विजेतेपद मिळवून दिले. यात 15 सुवर्ण, 10 रौप्य व 10 कांस्यपदकांचा सामवेश आहे. त्याचबरोबर नाशिक संघाने उपविजेतेपद राखले. परभणीच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ऑल केन्पो काई महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष अरुण माडूकर, राज्य सचिव संजय जीनवाल, उपाध्यक्ष रफिक जमादार, मराठवाडा अध्यक्ष विलास म्हस्के, समाजसेवक दिलीप जाटवे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन सिताराम गायकवाड यांनी केले. त्याचबरोबर स्पर्धेचे पंच म्हणून स्नेहल जीनवाल, अश्विनी तरटे, प्रियांका तरटे, नीलम जाटवे, पूजा भारसाखळे, फिरोज शेख, समीर शेख, महेंद्र रंगारी, शफीक पठा रहीम जमादार यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील पदक विजेते

सुवर्णपदक - श्रेयस पाटील, सम्राट दाभाडे, राज निकम, गजानन मेहरा, आदित्य वाघचौरे, मयूर काळवणे, शुभम सिंग, आदिती दास, धनश्री शिंदे, नंदनी दास, अश्विनी लोधे आणि राजगिरी हिवराळे. रौप्यपदक - शांतवन निर्मल, ओम सिंग, धनंजय महेरा, आलिया पठाण, आयशा पठाण, अनुराग दास आणि सुरज लहाने.

खेळाडूंच जीवनात संघर्ष करु शकतात - माडूकर

मुलांना अभ्यास बरोबर खेळाची देखील ताळमेळ जुळवावा लागतो. खेळाडू बनने सोपे नाही. त्यासाठी एकाग्रतेने प्रचंड मेहनत करावी लागते. तेव्हा कुठे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतो. त्यानंतर लोकांना त्याचे नाव माहिती होते. त्यापूर्वी केलेला संघर्ष समाजाला माहिती नसतो. आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. त्याचा सामना करण्याची हिम्मत खेळाडूंमध्ये निर्माण होते, तो कधीही खचत नाही. तो पराभवातून प्रत्येक वेळी नव्याने उभारी घेत असतो, असे प्रतिपदान राज्य संघटनेचे अध्यक्ष अरुण माडूकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...