आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय मिनी व युथ टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा:मुलांच्या गटात परभणीचा विजय; मुलींच्या गटात बीड संघाने जिंकले सुवर्ण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस व्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ जालनाच्या वतीने आयोजित 24 व्या राज्यस्तरीय मिनी व युथ टेनिस व्हॉलिबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत मुलांच्या गटात परभणी संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. मुलीच्या गटात बीड जिल्हा संघ चँम्पियन बनला.

मिनी मुलांच्या गटात अंतिम सामन्यात परभणी संघाने व बुलढाण्याला चुरशीच्या लढतीत 2-1 सेटने पराभूत करत प्रथम क्रमांक पटकावला. बीडच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

थाटात स्पर्धेचा समारोप

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून 20 जिल्ह्यातील 250 खेळाडू सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडू व संघाना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनिसव्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉ. व्यंकटेश वांगवाड होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, राज्य सचिव गणेश माळवे, नागनाथ आयलाने, संतोष वाबळे, तुळशिराम पाटील शेळके, स्पर्धा आयोजक गजानन पाटील वाळके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य चिटणीस गणेश माळवे तर सुत्रसंचलन प्रा. नागेश कान्हेकर, आभार प्रदर्शन प्रा. विजय गाडेकर यांनी मानले.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

मिनी मुलीच्या गटात अंतिम सामना बीड व नाशिक जिल्हा चुरशीच्या लढतीत 2:1 सेट नाशिक जिल्हाचा पराभव

  • प्रथम: बीड
  • व्दितीय : नाशिक
  • तृतीय : पुणे शहर.

युथ मुलांच्या गटात अंतिम सामना परभणी व नाशिक जिल्हा चुरशीच्या लढतीत 2:1 सेट मध्ये जिल्हा नाशिकचा पराभव

  • प्रथम: परभणी
  • व्दितीय: बुलडाणा
  • तृतीय:बीड

युथ मुली - अंतिम सामना बीड व सांगली जिल्हा चुरशीच्या लढतीत २:० सेट नाशिक जिल्हाचा पराभव

प्रथम: बीड

व्दितीय: सांगली

तृतीय : नाशिक

मिश्र दुहेरीत मिनी गटात अनुक्रमे बीड, लातूर, पुणे विजयी ठरले. मिश्र दुहेरीत युथ गटात अनुक्रमे बीड, नाशिक, बुल़डाणा विजयी ठरले.

बातम्या आणखी आहेत...