आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय टेनिस, व्हॉलीबॉल स्पर्धा:औरंगाबाद, बीड संघाने पटकावले सुवर्णपदक, यजमान परभणी संघ तिसऱ्यास्थानी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने फ्रेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरूष गटात औरंगाबाद संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तसेच महिला गटात बीडच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. त्याचबरोबर मिश्र दुहेरी गटात परभणीच्या संघाने बाजी मारली.

सेलू येथे झालेल्या स्पर्धेत 25 जिल्हा संघटनांच्या महिला-पुरुष अशा 50 संघांतील एकूण 180 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

पुरूष गटात औरंगाबादच्या संघाने सांगलीवर रोमांचक लढतीत 2-1 सेटने मात करत प्रथम क्रमांक मिळवला. सांगली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत औरंगाबादने यजमान परभणीला 2-1 सेटने हरवत अंतिम फेरी गाठली होती. या गटात यजमान परभणीच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

परभणी उपविजेता, बुलडाणा तिसरा

महिला गटातील अंतिम लढतीत बीड संघाने यजमान परभणी संघावर अतितटीच्या लढतीत 2-1 ने मात करत अजिंक्यपद मिळवले. बीडने सुरुवातीपासून स्पर्धेत वर्चस्व राखले होते. परभणीचा संघ उपविजेता ठरला. बुलडाणा संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर, मिश्र दुहेरी प्रकारात परभणी ग्रामणीच्या संघाने प्रथम क्रमांक आपल्या नावे केले. परभणीचाच शहर संघाने उपविजेतेपद राखले. या गटात देखील बुलडाणा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

विजेत्या - उपविजेत्या संघांना माजी राज्यमंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. वरपुडकर म्हणाले की, महाराष्ट्र जन्मलेला नाविण्यपूर्ण टेनिस व्हॉलीबॉल हा भरपूर व्यायाम देणारा खेळ आहे. विविध खेळांच्या कौशल्याचा वापर करून डॉ. व्यंकटेश वागवांड यांनी या खेळाचे संशोधन करून देशाला नवीन खेळ दिला. कबड्डी, खो-खो खेळाप्रमाणे टेनिस व्हॉलीबॉल खेळास आरक्षणासाठी मंञालयात प्रश्न मांडू, असे आश्वासन दिले. बक्षीस वितरण प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव डॉ. व्यंकटेश वांगवाड, मुकेश बोराडे, हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, अशोक काकडे, उद्योजक नंदकिशोर बाहेती, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डीकर, राज्य सचिव गणेश माळेव आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...