आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाज जागृती मेळावा:धनगर समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - यशोमती ठाकूर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर समाजाला अनु.जमातीचे आरक्षण देणे, मेंढपाळांचा चराई व रोगराईवरील उपचार, भटक्या विमुक्त आर्थिक विकास महामंडळाला अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे, आदी धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत मी सरकार दरबारी पाठपुरावा करुन धनगर समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित धनगर समाज जागृती मेळाव्यात (करमाड, ता. जि. औरंगाबाद) त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कगॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याणराव काळे,जय मल्हार अहिल्या सेनेच्या प्रदेशाध्यक्षा रंजना बोरसे, जि. प. अध्यक्ष मीना शेळके, जय मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी काटकर, दत्ताभाऊ म्हेत्रे, कॉंग्रेस ता. अध्यक्ष रामू शेळके, संदीप बोरसे, किरण डोणगावकर, जि. प. सदस्य प्रकाश चांगुलपाई, विष्णू खरपे, मार्केट कमेटीचे प्रशासक जगन्नाथ काळे आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून ठाकुर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्याबाबत भाजप सरकारने फक्त आश्वासन देऊन पाच वर्षे धनगर समाजाला झुलवत ठेवले. पण एस. टी. आरक्षण काही दिले नाही. ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे. मेंढपाळांवरील केसेस काढून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी मुख्य अतिथी म्हणून बोलताना डॉ. कल्याणराव काळे यांनी सांगितले.

धनगर समाजाला अनु.जमातीचे आरक्षण सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये देवू अशी वल्गना करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मानगुटीवर टीस नावाचे भुत बसवुन पाच वर्षे धनगर समाजाची दिशाभूल करीत राहिले. धनगर समाजाच्या पाठित खंजीर खुपसला. याचा बदला धनगर समाज घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी घणाघाती टीका यावेळी बोलताना जय मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे यांनी केली. याप्रसंगी कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, रंजनाताई बोरसे, प्रकाश चांगुलपाई, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक विठ्ठल कोरडे यांनी तर आभार जय मल्हार सेनेचे दादाराव गायके यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...