आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य परिचर्या परिषद निवडणूक यादी प्रकरण:वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना अवमानना नोटीस, 15 जुलैला हजर राहण्याचे आदेश

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या निवडणुकीत निवडलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी न करून अवमान केल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अनिल पानसरे यांनी नोटीस बजावून 15 जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी वकील. अश्विन होन यांनी अ्वमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या (महाराष्ट्र नर्सिगं कौन्सिल) पदाधिकारी निवडीची निवडणूक ऑक्टोबर 2021 मध्ये पार पडली. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडलेल्या पदाधिकाऱयांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याकडे पाठवली होती. त्यांनी नावे राजपत्रात नोंद केली नाहीत. त्यानंतर अनुसया नारायण सावरगावे यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली. त्यावर 18 एप्रिल 2022 रोजी सुनावणी झाली. खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण सचिवांनी निवडलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे नामनिर्देशित सदस्यांच्या यादीनुसार दाेन आठवड्यात प्रसिद्ध करावीत, असे निर्देश दिले हाेते. 21 एप्रिल राेजी उच्च न्यायालयाचा आदेशही सचिवांना कळवण्य्ात आला. 23 मे 2022 राेजी एक कायदेशीर नाेटीसही त्यांना बजावण्यात आली. त्यानंतरही साैरभ विजय यांनी नावे प्रसिद्ध केली नाहीत. त्यामुळे अवमानना याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने नाेटीस बजावून 15 जुलै राेजी हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच तत्पूर्वी उत्तर दाखल करावेत, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...