आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:अत्याधुनिक आधार सेंटर शहरात सुरू; अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारतर्फे प्रत्येक विभागात आधार सेवा सेंटर सुरू करण्यात येत आहे. याच अंतर्गत मराठवाड्यासाठी औरंगाबादेत जालना रोडवरील सिंचन भवनसमोर आणि महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाच्या बाजूला विभागीय आधार सेवा सेंटर सुरू करण्यात आले. रविवारी (८ मे) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडमोडे, महेश माळवतकर यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले.

या सेंटरमधून प्रत्येक दिवशी एक हजार आधार कार्ड तयार करण्याची क्षमता आहे. अद्ययावत टेक्नॉलॉजीच्या मध्यमातून हे सेंटर आठवड्यातील सातही दिवस सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सुरू राहणार आहे. यासाठी सक्षम आणि प्रशिक्षित २२ जणांचा स्टाफ कार्यरत असल्याची माहिती सेंटरचे संचालक मनोज पांडे यांनी सांगितली. डॉ. भागवत कराड म्हणाले की, प्रत्येक विभागीय स्तरावर एक आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

जनतेसाठी मोफत सुविधा असली तरी याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात येतात. जनधन खाते, आधार कार्ड आणि मोबाइल लिंक झाल्यानंतर त्यांची माहिती केंद्र सरकारकडे जाते. त्यानुसार विविध योजनेच्या लाभधारकास थेट खात्यात लाभ मिळतो. आधार कार्ड ही प्रत्येकाची ओळख असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...