आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजभवनतर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर खेळाडूंच्या जल्लोषात बक्षिस वितरण झाले. विशेष म्हणजे, 24 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला. मुलांनी चार सूवर्णपदक जिंकत ‘जनरल चँम्पियनशिप’वर विद्यापीठाचे नाव कोरले. मुलींच्या संघाला मात्र कबड्डी, खो-खो स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अथेलिटिक्समध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
क्रीडा महोत्सवात व्हॉलिबॉल, अथॅलेटिक्स, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल खेळ होते. चार मुख्य क्रीडा प्रकारात पुरुष व महिला गटात 372 सामने खेळलण्यात आले होते. साखळी व बाद फेरी, उपांत्य व अंतिम सामन्यांचाही त्यात समावेश आहे. व्हॉलिबॉल स्पर्धेत 98 सामने झाले. बास्केटबॉल व कबड्डीत प्रत्येकी 93 सामाने झाले. खो-खो मध्ये 88 सामने खेळले गेले. अॅथलेटिक्स गटात 14 प्रकारच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत 22 विद्यापीठांच्या 2 हजार 389 खेळाडूंनी सहभाग घेतला. 345 प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकही खेळाडूंना पाच दिवस प्रोत्साहन देत होते. राज्यातील 140 तज्ज्ञ पंचांनी निरपेक्ष भावनाने खेळाडूंचे परीक्षण केले.
..
यजमान संघाला मिळाले 260 गुण
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल तथा कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी 24 वर्षांपूर्वी सांस्कृतिक क्षेत्रासाठी इंद्रधन्युष्य तर खेळांसाठी ‘अश्वमेध’ क्रीडा स्पर्धा भरवण्यास सुरूवात केली होती. तेव्हापासून राज्यातील विविध विद्यापीठांतून अश्वमेध भरवण्यात आले. मात्र काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे अश्वमेध नाव बदलून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव असे संबोधण्यात येऊ लागले होते. डॉ. आंबेडकर विद्यापीठाला 24 पैकी 3 वेळा क्रीडा महोत्सवाचा मान मिळाला.
मात्र 24 वर्षांत पहिल्यांदाच ‘जनरल चॅम्पियनशिप’ची ट्रॉफी जिंकण्याची संधी यजमान संघाला मिळाली आहे. त्यासाठी संघाला 260 गुण मिळवावे लागले. पुरुषांच्या संघांनी व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, खो-खो व कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकले. मुलींच्या संघाने खो-खो व कबड्डी गटातील रौप्यपदक जिंकले. सावित्रीबाई फुुुले विद्यापीठाला 220 गुणांसह दुसरे स्थान मिळाले. मुलांच्या संघाचे सर्वसाधारण विजेतेपद यजमान संघाने तर मुलींच्या गटातील 200 गुणासह विजेतेपद पुणे विद्यापीठाला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.