आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य शासनाचे वर्ष 2019चे पुरस्कार जाहीर:अच्युत गोडबोले, शफाअत खान यांना राज्य वाङ्मय पुरस्कार; औरंगाबादचे सुनंदा गोरे, संदीप जगदाळे मानकरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दिले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वर्ष २०१९ गुरुवारी जाहीर झाले. त्यामध्ये लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर’, मंगेश नारायणराव काळे यांचा ‘तहरीर पोएट्रीवाला’ हा कवितासंग्रह आणि शफाअत खान यांच्या ‘गांधी आडवा येतो’ या नाटकाचा समावेश आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बालवाङ्मय प्रकारात औरंगाबादच्या सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ नाटकास भा.रा. भागवत पुरस्कार तर पैठणचे कवी संदीप शिवाजीराव जगदाळे यांच्या “असो आता चाड’ या काव्यसंग्रहास बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार घरपोच मिळणार
प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या वाङ्मय प्रकारामध्ये पुरस्कारासाठी एकाही पुस्तकाची शिफारस नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पुरस्काराकरिता पात्र साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येईल, असे मराठी भाषा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...