आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलेनगरातील देशी दारूचे दुकान बंद करा‎:दारूबंदी संघर्ष समितीचे  उत्पादन शुल्क विभागाला निवेदन, नागरिकांचे मतदान घेण्याची मागणी ‎

छत्रपती संभाजीनगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथनगर, महात्मा फुलेनगर‎ येथील देशी दारूच्या दुकानाचा‎ परवाना रद्द करण्यासाठी मतदान‎ घेण्याची मागणी पीरबाजार येथील‎ दारूबंदी संघर्ष समितीने केली आहे.‎ यासंदर्भात समितीने राज्य उत्पादन‎ शुल्क विभागाच्या अधीक्षकांना‎ बुधवारी निवेदन दिले.‎ पीरबाजार परिसरातील एकनाथनगर,‎ महात्मा फुलेनगर (जुना वाॅर्ड क्रमांक‎ ९७ व नवा वाॅर्ड क्रमांक १०१) येथे‎ शासनमान्य देशी दारूचे दुकान आहे.‎ या दुकानापासून सुमारे ५० फुटांवर‎ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा‎ पुतळा व धार्मिक स्थळे आहेत. ‎ ‎ नागरिकांना या दुकानासमोरूनच‎ ये-जा करावी लागते. तेथे येणारे‎ ग्राहक मद्यप्राशन केल्यानंतर‎ नागरिकांना शिवीगाळ, धक्काबुक्की ‎ ‎ करतात. ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे ‎ ‎ प्रकारही घडले आहेत, असे या ‎ ‎ निवेदनात म्हटले आहे.‎ हे दुकान बंद करण्यासाठी‎ परिसरातील नागरिकांचे मतदान‎ घेण्यात यावे, अशी मागणी‎ निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या‎ ‎ ‎ प्रति विभागीय आयुक्त,‎ जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या‎ निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.‎

एकनाथनगर, महात्मा फुलेनगर येथील देशी दारुचे दुकान बंद करण्याच्या‎ मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...