आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:भरपूूर पाणी, दिनचर्या, व्हिटॅमिनने राहा फिट ; प्रकाशनप्रसंगी सुखद वृद्धापकाळाच्या टिप्स

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारांचे निदान होण्याच्या किमान १० वर्षांपूर्वी त्याची सुरुवात झालेली असते. पन्नाशीनंतर शरीर नैसर्गिकरीत्या कमकुवत होऊ लागते. तेव्हा विविध आजार डोके वर काढतात. त्यामुळे मानवी आरोग्याचे आहार, विहार, व्यायाम या तिन्ही स्तंभांविषयी जागरूक रहा, ज्यामुळे पन्नाशीनंतर आजार उद्भवल्यास नियंत्रण मिळवणे शक्य होते, असे मत स्नेहा शिनखेडे लिखित पुस्तकप्रकाशनप्रसंगी तज्ज्ञांनी व्यक्त केले. डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या दामुअण्णा दाते सभागृहात निर्मलोत्तम न्यास आणि विवेक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. उद्योगपती शेखर देसरडा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. बाळासाहेब नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हे आयोजन केले होते.

भरपूर पाणी, आठ तासांची झोप पन्नाशीनंतर येणारा थकवा आजाराचे लक्षण आहे. प्रामुख्याने बीपी आणि शुगर मोठ्या प्रमाणात तोंड वर काढतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवे. व्हिटॅमिन सप्लिमेंट वेळोवेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात. दररोज किमान ८ तास शांत झोप घ्यावी. रोज अर्धा तास चालणे आवश्यक आहे. नियमित वैद्यकीय तपासणी करून आपले शरीर जाणून घेत राहावे, असा सल्ला डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सागर गुप्ता यांनी दिला.

शरीर आणि आहाराचे अतूट नाते जसा आहार तुम्ही करता तसेच तुम्ही दिसू लागता. योग्य आहार असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या उत्तम राहते. आहारात कडधान्य, डाळी, ज्वारी, बाजरी, गहू यांचा समतोल कायम राहील याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. विविध प्रकारच्या कोशिंबिरीतून शरीराला फायदा होतो. आपले ताट रंगीत असावे. गाजर, पपई, काकडी, भात या सर्वांची शरीराला आवश्यकता आहे, असे मत आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी व्यक्त केले.

जीवनशैली नियमित करा आयुष्य नियमित जगले पाहीजे. विशेषत: पन्नाशीनंतर लवकर निजा, लवकर उठा, दररोज नियमित पण सहन हाेईल असा व्यायाम करा. ध्यानधारणा आणि प्राणायाम करा. अन्न ग्रहण करताना नियमित वेळेत करा. शरीरासाठी पूरक असलेला नैसर्गिक आहार घ्या. आपल्या क्षमतांपेक्षा अधिक करायला जाऊ नका. पाणी भरपूर प्या. गॅजेट्सऐवजी अनेकांशी संवाद साधून मन मोकळे करत राहा, असा सल्ला वैद्य संतोष नेवपूरकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...