आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:टीईटी घोटाळ्यात आयुक्तांच्या आदेशास स्थगिती; पन्नास शिक्षकांना दिलासा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) घोटाळ्यासंबंधी राज्यातील ७,८८० शिक्षकांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या आयुक्तांनी ३ ऑगस्ट २०२२ रोजी कारवाई करत प्रमाणपत्र अवैध घोषित केले होते. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी आयुक्तांच्या आदेशाला यापूर्वी स्थगिती दिली होती.

शिक्षकांना वेतन द्यावे, परंतु वेतनवाढ देऊ नये असा आदेश देत दिलासा दिला आहे. गुरुवारी पुन्हा खंडपीठात आलेल्या पन्नास शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. विनोद पाटील, अॅड. विलास पानपट्टे, अॅड. हरीष बाली, अॅड. सोनल बाली, अॅड. संजय कोल्हाटे, अॅड. पराग बर्डे, अॅड. राहुल सावळे, अॅड. मदन कानजोड आदींनी युक्तिवाद केला. विजय कुऱ्हे, अजय कदम, सचिन पवार, कल्पिता कोटे आदींनी याचिका दाखल केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...