आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदी लांबली:साहित्याअभावी अजूनही अँजिओप्लास्टीची प्रतीक्षा; दीड महिन्यापासून घाटीतील रुग्ण वेटिंगवर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीत सुपरस्पेशालिटी विभागात दीड महिन्यापूर्वी हृदयरोग विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आठवडाभरात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुरू करणार असल्याचे प्रभारी अधिष्ठातांनी सांगितले होते. पण, हा विभाग सुपरस्पेशालिटीमध्ये प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतरही अद्यापही अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुरू झालेली नाही. या विभागात अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी लागणारे साहित्य, स्टेंटच्या खरेदीअभावी ही प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे रुग्णांना सेवेपासून वंचितच राहावे लागत आहे.

घाटीत सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होऊन दोन वर्षे झीले तरीसुद्धा कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार सुरू केले नव्हते. सध्या डायलिसिस आणि न्यूरॉलॉजी विभागाची ओपीडी सुरू आहे. घाटीतील सुपरस्पेशालिटी विभागात हृदयरोग विभाग सुरू झाल्यानंतर अत्याधुनिक मशिनरीदेखील बसवण्यात आली. त्यासाठी फोरडी इकोची मशीन उपलब्ध आहे. त्यावर सर्व रुग्णांची तपासणी केली जाते.

आठवडाभरात साहित्य खरेदी करणार : डॉ. रोटे
सुपरस्पेशालिटीत फोरडी इको अत्याधुनिक मशीन आली आहे. त्यामुळे इमेज मिळणार आहेत. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी लागणारे साहित्य, स्टेंटची खरेदीअभावी पुढील प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे म्हणाल्या, ७० टक्के खरेदी झाली आहे. येत्या आठवडाभरातच सर्व खरेदी करण्यात येईल. त्यानंतर शस्त्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोज ६० रुग्णांची तपासणी
या संदर्भात मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, सध्या ओपीडीत रोज ६० रुग्ण येतात. यात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या चार दिवस ओपीडी सुरू असते. यात अँजिओग्राफीसाठी चार रुग्ण आहेत. त्यांचीही आठवडाभरातच अँजिओग्राफी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यूरॉलॉजीला ९० पेक्षा अधिक रुग्ण
सुपरस्पेशालिटीत सुरुवातीला न्यूरॉलॉजी विभाग सुरू करण्यात आला. त्यात दर बुधवारी ओपीडी सुरू असते. यात ९० ते १०० रुग्ण असतात. महिन्याकाठी ही संख्या पाचशेवर असते. कायमस्वरूपी विशेष कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे त्याचा परिणाम सुपरस्पेशालिटीच्या कामावर होत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...