आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरीत्या तस्करी:तहसील कार्यालयातून पुन्हा जप्त केलेला वाळूचा हायवा चोरीला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा जप्त केलेला हायवाच तहसील कार्यालयातून चोरीला गेल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील याच कार्यालयातून जप्त केलेली वाहने चोरीला गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून वारंवार वाहने चोरीला जातात कशी, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळून विनाक्रमांक हायवा वाळू घेऊन जात असताना तहसीलदारांनी पकडला होता. त्याच्याकडे राॅयल्टी नसल्याने तो जप्त करुन कार्यालयाच्या आवारात उभा केला. मात्र, ३ नोव्हेंबर रोजी रात्रीतून सरकारी जप्तीतील हा हायवा चोरीला गेला. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रशांत देवडे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार िदली. त्यामुळे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे छावणीच्या दिशेने हायवा गेल्याचे स्पष्ट झाले. लाड यांनी तत्काळ संशयावरून चालक शांतीलाल भिवसन कांबळे (३२, रा. बनेवाडी) याला ताब्यात घेतले असता त्याने छावणीत हायवा उभा केल्याची कबुली दिली. मालक शेख तौफिक ऊर्फ पप्पू शेख दाऊत (३४, रा. संजयनगर, बायजीपुरा) यालाही आरोपी केले आहे. लाड यांच्यासह विलास काळे, गजानन शेळके, मनोहर त्रिभुवन यांनी कारवाई पार पाडली. काही महिन्यांपूर्वीच एक जेसीबी चोरीला गेला. त्यासाठी पोलिसांकडे विभागाने तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...