आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीगोद्री:धावत्या दुचाकीने घेतला पेट; चालक बचावला, वडीगोद्री शिवारात दुचाकी जळून खाक झाली.

वडीगोद्री10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील गोंदी येथून वडीगोद्रीकडे टरबूज विकण्यासाठी जाणारे विलास बाबूराव पंचलोटे हे दुचाकीने (एमएच २१- ९८५९) जात असताना वडीगोद्री शिवारात दुचाकीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत पंचलोटे यांनी उडी मारून बाजूला गेल्याने अनर्थ टळला.

सुदैवाने त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु विलास पंचलोटे यांच्या सांगण्यावरून गाडी सकाळपासून उन्हामध्ये उभी होती व गाडीमध्ये ५ ते ६ लिटर पेट्रोल होते. उन्हामध्ये गाडी उभी असल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज विलास पंचलोटे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...