आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:मंत्री सत्तार यांच्या रोजाबागेतील घरावर दगडफेक; राष्ट्रवादीचे पदाधिकारी ताब्यात

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खा. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अनुद्गार काढणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राेजाबाग येथील घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. ही माहिती मिळताच पाेलिसांनी धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ठाण्यात नेऊन समज देत त्यांना सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सत्तार यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सत्तार यांच्याविराेधात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...