आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:प्लॉटच्या वादातून दोन गटांत दगडफेक ; पीरबाजारात पोलिसांवरही दगडांचा केला वर्षाव

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटच्या वादातून सोमवारी (६ मार्च) सकाळी पीरबाजारात झालेल्या वादातून दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या दिशेनहीे बेफाम दगडफेक केली. यात उपनिरीक्षक कौतिक गोरे व हवालदार वाघचौरे हे जखमी झाले आहेत. उपायुक्त शीलवंत नांदेडकर, पोलिस निरीक्षक गीता बागवडे घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. बागवडे यांनी एका गटाला उस्मानपुरा ठाण्यात ठेवून त्यांची फिर्याद घेतली, तर दुसऱ्या गटाला जवाहरनगर ठाण्यात नेऊन त्यांचे जबाब नोंदवले.

माणिकचंद महोतोले यांच्या फिर्यादीनुसार पीरबाजार येथे त्यांचा वडिलोपार्जित प्लॉट असून तो वर्ष २०१७ मध्ये युनूसखान अहेमद खान (रा. पीरबाजार) यांना विक्री केला आहे. त्याच्या मालकी हक्कावरून प्रेमचंद महाेतोले व इतरांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निकाल माणिकचंद यांच्या बाजूने लागला. यातूनच अधूनमधून किरकोळ वाद होत असत. ६ मार्च रोजी युनूसखान हे जागेचा ताबा घेण्यासाठी गेले असता प्रेमचंद महोतोले व त्यांच्या नातेवाइकांनी युनूसखान यांच्यासोबत वाद घातला. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले.याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी युनूस खान, एजाज खान, जाकी शेख, फेरोज, लाला युनूसचा मुलगा, खाजामिन, हाशिम पटेल, आकाश गायकवाड, प्रेमचंद महोतोले, विनोद महोतोले, संतोष महोतोले, खेमचंद महोतोले, विक्रम महोतोले, प्रवीण महोतोले व इतर अशा दोन्ही गटांच्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...