आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शहरात तुफान दगडफेकीने तणाव, सहा जण जखमी, हिंगोली शहर पोलिस घटनास्थळी दाखल, वातावरण तणावपूर्ण

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात दगडलागण्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) रात्री साडे नऊ वाजता घडली आहे. या दगडफेकीत पाच ते सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह दंगा काबू पथक दाखल झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण तणावपूर्ण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या काही तरुणांना दगड मारण्यास सुरवात केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले. या वादातून हाणामारी सुरु झाली. दोन्ही कडून मोठा जमाव एकत्र आला होता. यामध्ये काही जणांनी तलवारीचाही वापर केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका गटाने दगडफेकीला सुरवात केली. रस्त्यावर मिळेल ते दगड जमावावर भिरकावले जात होते. त्यामुळे रस्त्यावर दगड व विटांचा खच पडला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्यासह हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेऊन दंगा काबू पथक मागविण्यात आले आहे. सध्या रिसालाबाजार परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमध्ये सहा जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले असून हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके शोध घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...