आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्डी मोड येथे एसटी बसवर दगडफेक, बसच्या काचा फुटल्याने नुकसान

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्डी मोड शिवारामध्ये कळमनुरी आगाराच्या बसवर अज्ञात चार जणांनी दगडफेक केल्याची घटना मंगळवारी (ता. १६)  सायंकाळी पाच वाजता घडली आहे. यामध्ये बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी आगाराची बस (क्रमांक एम एच 20 बी एल 29 02) कळमनुरी येथून आखाडाबाळापुर कडे सोडण्यात आली होती. त्या ठिकाणी प्रवासी सोडून ही बस सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परत कळमनुरी कडे येत होती. ही बस पार्डीमोड शिवारामध्ये आलीअसताना अज्ञात चार जणांनी अचानक बस समोर येऊन बस थांबवली. त्यानंतर बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून केबिनच्या काचांचेही नुकसान झाले .

या प्रकारामुळे घाबरलेल्या एसटी चालक व वाहक यांनी बस जागेवरच सोडली आणि कळमनुरी आगारात धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावर असलेली बस बंदोबस्तामध्ये कळमनुरी येथे आणली. बसवर दगडफेक करणारे चौघेजण मात्र फरार झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दगडफेकीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. बसमध्ये चार ते पाच प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...