आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा साठवणुक:रमानगरातील कचरा साठवणे बंद करा, अन्यथा आंदोलन करू ; नगरसेविका वाडकर यांचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कचरा समस्या संपुष्टात येत असतानादेखील मनपाने रमानगर स्मशानभूमीजवळील खुल्या जागेवर पुन्हा कचरा साठवण्यास सुरुवात केली आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून कचरा साठवणे सुरू आहे. त्यामुळे पावसात या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा साठवणे बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मनपाला दिला आहे.

रमानगरातील ही जागा मध्यवस्तीत आहे. या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत आहे. मनपाने यापूर्वीदेखील या भागात कचरा साठवणे सुरू केले होते. तेव्हा नागरिकांनी आंदोलन करत या संकलन केंद्राला टाळे ठोकले होते. तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी फक्त या ठिकाणी वाहनांची पार्किंग होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या ठिकाणी पुन्हा कचरा साठवण्यास सुरुवात झाली असून शेडचे कामही सुरू आहे. या शेडच्या कामाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...