आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटा इतिहास दाखवणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद करा:संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव’ चित्रपट तत्काळ बंद करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड ताे बंद पाडेल, असा इशारा प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व केंद्रीय कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भानुसे यांनी कळवले आहे.

या चित्रपटात शूरवीरांच्या कर्तृत्वावर खोडसाळपणा केला आहे. छत्रपती शिवरायांना रामदासी वेशात दाखवले आहे. कवड्यांची माळ घातली आहे. बाजीप्रभूंना शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदारांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलिता घेऊन बाजीप्रभूंकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधेंना शिपाई करणे आहे. बांदल देशमुख खुळी, व्यभिचारी दाखवली आहे. यात अशा अनेक चुकीच्या गाेष्टी आहेत. यासाेबतच “वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची स्क्रिप्ट संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...