आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करण्यासंदर्भात शासनस्तरावरील सर्व प्रक्रिया थांबवून विभाजन टाळावे, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालसमोर शुक्रवारी आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. या संदर्भात विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळण्यासाठी सतरा वर्षे रक्तरंजित संघर्ष करावा लागला आहे. तेव्हा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबर २०२० मध्ये विद्यापीठाचे विभाजन होणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु प्रशासकीय पातळीवर समिती गठित करून विभाजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तेव्हा सरकारने विद्यापीठाचे विभाजन होणार नाही असे जाहीर करावे, राज्य सरकारने यासाठी गठित केलेली समिती रद्द करावी, उस्मानाबाद केंद्रास सुविधा कशा पुरवल्या जातील याबाबत निर्णय घ्यावा आदी मागण्या केल्या. या वेळी अॅड. शिरीष कांबळे, दिनकर ओंकार, रमेश खंडागळे, बाबूराव कदम, विजय वाहूळ, मिलिंद शेळके, कृष्णा बनकर, बंडू कांबळे, प्रा. शंकर अंभोरे, प्रा. उमाकांत राठोड, दिलीप पाडमुख, नागराज गायकवाड, प्रा. सुनील वाकेकर, अरुण शिरसाठ, प्रकाश इंगळे, जयश्री शिर्के, संकेत कांबळे, अरविंद कांबळे, पवन पवार, मनोज वाहूळ, रमाकांत इंगळे, शैलेश लांडगे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.