आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर हर महादेव चित्रपट तात्काळ बंद करा:अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने शो बंद पाडू - प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाची मोडतोड करणारा. खोटा इतिहास दाखवणारा "हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने बंद पाडेल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व केंद्रीय कार्यकारणीची ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ.शिवानंद भानुसे कळवले आहे. या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे.इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे.मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी.बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे.कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे.बांदल देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहे.वारंवार मराठी मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे.राष्ट्रमाता बाजीप्रभूचां सल्ला घेताना दाखवल्या आहे. छत्रपती होतील ना राजे ?? अफजलखान क्रूर आहे हे बाजीप्रभू सल्ला देताना दाखवले आहे.म्हणजे छत्रपती यांच्या प्रगल्भ विचारांची चेष्टा केली आहे.छत्रपती यांना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे.छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला.असं खोट दाखवले आहे. शिवा काशिदला बाजीप्रभूंनी शोधून आणले असं खोटं दाखवलं आहे. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले. त्यांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन मारले असं दाखवले आहे.

याचबरोबर "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटाची स्क्रिप्ट संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. अन्यथा संभाजी ब्रिगेड हा चित्रपट चालू देणार नाही. असा इशाराही प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...