आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:अवैध वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक थांबवा; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अनेक स्कूलबस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध पद्धतीने वाहतूक करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे. ज्या शाळांनी विद्यार्थी वाहतूकीसाठी स्कूलबस व व्हॅन घेतलेल्या आहेत. त्या वाहनांची विद्यार्थी वाहकीचा परवाना असल्याबाबत खात्री करावी, परवान्याची सत्यप्रत संग्रहीत ठेवावी, परवाना नसलेल्या स्कूल बस व व्हॅन या वाहनांमधून शाळकरी मुलांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येवू नये,असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

कोरोनामुळे शहरातील शाळा बंद असल्या तरी ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक स्कूलबस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. ज्या वाहनांकडे विद्यार्थी वाहतूकीचा परवाना आहे, अशाच वाहनातून विद्यार्थी वाहतूक करण्यात यावी. तसेच शाळेकडून विद्यार्थी वाहतूक सुरक्षित व परवानाधारक वाहनातून होत असल्याबाबतचा लेखी अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालयास कळवावा, असे आदेश जिल्हा परीषद शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी अऩुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

अशी आहे स्कूलबससाठीची नियमावली

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी त्या वाहनांकडे वाहन अधिनियमाच्या कलम ७४ अंतर्गत वैध कंत्राट असणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाच्या मालकीची आणि केवळ स्कूलबस म्हणूनच वापरण्यात येणारी वाहने त्यांच्या सुरुवातीच्या नोंदणी तारखेपासून वीस वर्षांपेक्षा अधिक जुनी असू नये. प्रथमोपचार संच असावा, दोन एबीसी प्रकारातील अग्निशमन यंत्र, मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल, जेवणाचे डब्बे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, शालेय बसमध्ये प्रशिक्षित चालक, एक पुरुष व एक महिला परिचर असावेत. बसमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे, गणवेश सक्तीचा, वाहन चालकास ५ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक असून वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यांसाठी त्यास दंड झालेला नसावा. वाहतुकीचा परवाना, बिल्ला इत्यादी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser