आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्मापासून माझ्या शरीरात तिरपेपणा आहे. अलीकडे शरीरातील उजव्या भागात प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या. विविध उपचारांना सामोरे जावे लागणार होते. तेव्हा न्यूरोकायनेटिक थेरपीबद्दल कळले. पहिल्याच प्रयत्नात डॉ. प्राजक्ता नायर यांनी मला या थेरपीद्वारे शरीराच्या वरच्या भागात दिलासा दिला. आता पुढच्या टप्प्यात संपूर्ण शरीरावर उपचार होतील. महागड्या चाचण्या आणि वेळ वाचवणारे हे उपचार आहेत, असे न्यूरोकायनेटिक थेरपीच्या उपचारांनी बरा झालेल्या संदेश कलवणे यांनी सांगितले. अनेक अाजारांत फिजिओथेरपीचे उपचार परिणामकारक सिद्ध झालेले आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीत नवी संशोधने होत आहेत. याचप्रमाणे फिजिओथेरपीतील न्यूरोकायनेटिक उपचार पद्धती रुग्णांसाठी संजीवनी सिद्ध होत असल्याचे डॉ. नायर यांनी सांगितले.
शोभना जाधव म्हणाल्या, मला डॉक्टरांनी सहा महिने उपचार सांगितले होते. शिवाय शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, न्यूरोकायनेटिकमुळे तत्काळ फरक पडला. जो हात सहा महिने बांधून ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता आणि सातत्याने मी वेदना सहन करत होते, त्या वेदना या थेरपीमुळे दोन दिवसांत थांबल्या. कचरू यांना गेल्या दीड वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता. आम्ही जबडा आणि हायॉइडवर (जबड्याखाली तरंगणारे हाड) काम केले आणि एका सत्रात १००% आराम मिळाला. डॉ. नायर म्हणाल्या, तीन वर्षांपासूून हे उपचार सुरू केले. यात रुग्णांना सामान्य फिजिओथेरपीप्रमाणे उपचारांसाठी वारंवार यावे लागत नाही. खर्चिक चाचण्यांची गरज नाही. शरीराच्या एखाद्या अंगाला होणारी वेदना आणि वेदनांचे कारण (मेंदूमध्ये संचयित अकार्यक्षम नमुना) यांच्यातील गहाळ दुवा शोधण्यात यश आले आहे.
अशी काम करते थेरपी डॉ. नायर म्हणाल्या की, आम्ही मेंदूमध्ये विकसित झालेल्या अकार्यक्षम पॅटर्नला संबोधित करतो. स्नायू, अस्थिबंधन आणि चट्टे सोडवून आणि कमकुवत स्नायू सक्रिय करून ते दुरुस्त करतो. वेदनांमुळे शरीराने विकसित केलेली चुकीची हालचाल पद्धत शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. या चुकीच्या हालचालीवर योग्य निदान व उपचार झाल्याने रुग्णांना कायमचे बरे वाटायला लागते. चुकीच्या हालचालींनी स्नायू जास्त काम करतात आणि घट्ट होतात आणि स्नायूंची स्थिरता कमकुवत होते. तेव्हा वेदना होतात. एनकेटी थेरपीत वेदना कायमची दूर होते. त्यासाठी रुग्णाला रोज घरातच व्यायाम करावा लागतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.