आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:पोलिस आयुक्तालयासमोर तुफान हाणामारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ठिकठिकाणी झुंडशाही करून दहशत पसरवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच गुरुवारी रात्री मिल कॉर्नर येथील पोलिस आयुक्तालयासमोरच तरुणांचे दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ऐन पोलिस आयुक्तालयासमोरच झुंडगिरी करण्याची या टोळक्यांची हिंमत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा-पावणे अकरा वाजेच्या दरम्यान दहा ते पंधरा जणांचा गट अचानक जमा झाला. सुरुवातीला शिवीगाळ करून बाचाबाची सुरू असतानाच त्यांच्यात तुफान हाणामारी सुरू झाली. एकमेकांना हाताचापटाने मारहाण सुरू असताना त्यातील काही जणांनी एकमेकांना जमिनीवर पाडून पायाखाली तुडवणे सुरू केले. पाहता पाहता बघ्यांची गर्दी झाली. परिसरातील दुकानदार, व्यावसायिक धास्तावले. या घटनेची माहिती आयुक्तालयात हजर अधिकाऱ्यांना कळताच ते कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.

पोलिस येत असल्याचे पाहून दोन्ही गटातील बहुतांश जणांनी पळ काढला. काही तरुणांना पोलिसांनी पकडून आयुक्तालयात नेले. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, या विषयी ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, आयुक्तालयासमोर असा प्रकार होतो, याबद्दल पोलिस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...