आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर चरसची विक्री प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी फरार आरोपीला सोमवारी (७ नोव्हेंबर ) बेड्या ठोकल्या. आरोपीला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी मंगळवारी दिले. सिकंदर खान ऊर्फ बबी बाबर खान (२५, रा. आसेफीया कॉलनी, टाऊन हॉल) असे आरोपीचे नाव आहे.
एनडीपीएसच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहिती आधारे त्यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर सापळा रचून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या शेख शाहरूख आणि त्याच्या आधारे सय्यद नाजेरुद्दीन ऊर्फ मौला याला अटक केली होती. त्यांच्याकडून १० तोळे ४ ग्रॅम चरस, ३७ हजार २०० रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल आणि दुचाकी (क्रं. एमएच-२०-सीई-१६०८) असा १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. चौकशी दरम्यान त्यांनी सिकंदर खान ऊर्फ बबी याच्याकडून चरस खरेदी केल्याची कबुली दिली. प्रकरणात सहायक फौजदार नसीम खान शब्बीर खान (५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपींनी चरस कोठून व कोणाकडून आणली, याचा तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.