आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:रॉबिनहूड आर्मीमुळे रस्त्यावरंच्या मुलांची 94.3 माय एफएमच्या कार्यालयाला भेट

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत ९४.३ माय एफएमच्या कार्यालयाला शाळेतील मुलांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट दिली. रेडिआे कसा चालतो हे पहिले. आरजेंची भेट घेतली. रेडिआेच्या करिअरची माहिती घेतली, तर माय एफएममधून अनेकांनी रेडिआेचे प्रशिक्षण घेऊन इतर स्टेशनमध्ये नोकरीसुद्धा मिळवली आहे.

पहिल्यांदाच शहरात सामजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रॉबिनहूड आर्मीमुळे रस्त्यावरच्या मुलांना माय एफएमच्या कार्यालयाला भेट देता आली. आरजे प्रेषित, आरजे आकांक्षा आणि आरजे रसिकाला भेट दिली. ही भेट त्या मुलांसाठी नवीनच अनुभव होता. मुलांनी नियमित शाळेत जावे, आपल्या करिअरबाबतीत सिरियस व्हावे यासाठी संस्थेद्वारे असे उपक्रम राबवले जात अाहेत. रॉबिनहूड आर्मीमधून राजेश्री माने, अजिंक्य पूर्णपात्रे, उषा वानखेडे अादींची उपस्थिती हाेती. त्यांचे स्वागत ९४.३ माय एफएमचे स्टेशन हेड नितीन लोखंडे यांनी केले. माय एफएमच्या संपूर्ण टीमने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...