आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदार उषाराणी‎ देवगुणे यांचे आवाहन‎:मतदार अधिक जागरूक राहिल्यास‎ लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण‎

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर‎ मतदार हा लोकशाहीचा कणा आहे.‎ लोकशाही सुदृढ होण्यासाठी‎ मतदारांनी जागरूक राहाणे गरजचे‎ आहे असे आवाहन तहसीलदार‎ उषाराणी देवगुणे यांनी केले. रावेर‎ येथील तहसीलदार कार्यालयात‎ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त‎ आयोजित कार्यक्रमात त्या बोलत‎ होत्या.‎ अध्यक्षस्थानी फैजपूर विभागाचे‎ प्रांताधिकारी कैलास कडलग होते.‎ व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तहसीलदार डॉ.मयूर कळसे,‎ निवासी नायब तहसीलदार संजय‎ तायडे, ऐनपूर महाविद्यालयाचे‎ प्राचार्य जे.बी.अंजने उपस्थित होते.‎ यावेळी मतदार यादीत नाव नोंदणी‎ केलेल्या नव मतदारांना मतदान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ओळखपत्र वितरित करण्यात आले.‎ मतदार जनजागृतीनिमित्त‎ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात‎ आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस‎ वितरण झा ले. उत्कृष्ट बीएलओ,‎ कोतवालांना प्रशस्तीपत्र दिले.‎

बातम्या आणखी आहेत...