आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अनधिकृत शाळा सुरू दिसल्यास कडक कारवाई : शिक्षण उपसंचालक

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच राज्यातील अनधिकृत शाळांची आकडेवारी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताना औरंगाबाद जिल्ह्यात एकही अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास संबंधित शिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी दिला आहे.

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार ८ शाळा अनधिकृत आहेत. या आठही अनधिकृत शाळा एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. मात्र, या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच शाळा शासनाची परवानगी न घेता सुरू असतील, तर त्याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी. पालकांनीही अनधिकृत शाळेत मुलांचा प्रवेश घेऊ नये. प्रवेशावेळी शाळेच्या मान्यतेची खात्री करावी. भविष्यात या संदर्भात काही समस्या उद्भवल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही उपसंचालक साबळे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...