आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:‘नायलॉन मांजा बंदीबाबत कठोर कारवाई करावी’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नायलॉन मांजा बंदीबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक स्थापन करावे, पोलिस महासंचालकांनी यात लक्ष घालावे, असे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले. या जनहित याचिकेवर ३ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी होईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर अधिकारी म्हणून जाण्यापेक्षा ग्राहक बनून जावे अशी सूचना न्यायालयाचे मित्र सत्यजित बोरा यांनी केली. विक्रीबाबत नागरिकांना तक्रारी करण्यासाठी फोन क्रमांक जाहीर करावा, असे अॅड. आनंद भंडारी यांनी सुचवले. केंद्राचे पत्र असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी सादर केले.

बातम्या आणखी आहेत...