आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपूर्वीच राज्यातील अनधिकृत शाळांची आकडेवारी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतांना औरंगाबाद जिल्ह्यात एकही अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास संबंधित शिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी दिला आहे.
8 शाळा अनधिकृत
औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहीतीनुसार 8 शाळा अनधिकृत आहेत. या आठही अनधिकृत शाळा एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. मात्र, या व्यतिरीक्त आणखी बऱ्याच शाळा शासनाची परवानगी न घेता सुरू असतील त्याचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई कराव्यात. तसेच पालकांनी अनधिकृत शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घेवू नये. प्रवेशावेळी शाळेच्या मान्यतेची खात्री करुन घ्यावी. भविष्यात या संदर्भात काही समस्या उद्भवल्यास त्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही. असे उपसंचालक साबळे यांनी कळवले आहे.
अनधिकृत शाळाची नावे
सनराईज इंग्लिश स्कूल अंबेलोहळ, द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, वाळूज- राजणगाव आणि बन्सिलाल नगर, मेमार ए डेक्कन उर्दु प्रा. शाळा उस्मानपुरा, बीड बायपास वरील नारायणा इ टेक्नो स्कूल, टेंडर केअर होम, जी.एस.एम. ग्लोबल स्कूल झाल्टा फाटा आणि गुरुकुल करिअर अॅव्हेन्यू स्कूल शरणापूर येथे शाळा मान्यतेचा बोर्ड लावलेला नसल्याचे शिक्षण उपसंचालकांच्या प्रगटनात म्हटले आहे.
मान्यतेचा बोर्ड आवश्यक
दरम्यान आठ अनधिकृत शाळा औरंगाबादमध्ये आढळून आल्या आहेत. प्रत्येक शाळेत शाळा मान्यता क्रमांक, युडाएस क्रमांक शाळेच्या प्रवेश द्वारावर लावणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे, असेही शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.