आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बुधवारपासून (१७ जून) तीन दिवसांसाठी कडक संचारबंदी (जनता कर्फ्यू) घोषित केला असून यादरम्यान घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच अख्तर शेख यांनी सांगितले. मागील आठ दिवसांमध्ये गावात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने रुग्णाची संख्या वाढत अाहे. यावर उपाय म्हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय सोमवारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या मासिक बैठकीत घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अख्तर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामसेवक नारायण रावते यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब साळे, मेहबूब चौधरी, राजेंद्र खोतकर, अनिल कोतकर, तस्लीम शेख, अंजीराबेगम शेख, फिरोजा शहा, पूजा उबाळे, सुमन खोतकर, मीरा गिऱ्हे, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती. असे असतील नियम : बुधवार, १७ जूनपासून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. या वेळी रुग्णालय व औषधी दुकाने वगळता इतर सर्वच आस्थापने बंद असणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यावर २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून नागरिकांना औषधीचे वाटप केले जाणार आहे. गावात नव्याने चार आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात यावी यासाठी जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे आदी निर्णय सभेत घेण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.