आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये लॉकडाउन:जिल्ह्यात 26 तारखेपासून 4 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन, 10 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • नगपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण भागांत सुद्धा कडक लॉकडाउन

वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात येत्या 26 मार्च पासून (25 आणि 26 मार्चच्या मध्यरात्री पासून) 4 एप्रिल 2021 पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या 10 दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या काळात सार्वजनिक उद्यानांसह खासगी आणि शासकीय बस सेवा सुद्धा खंडित केल्या जात आहेत.

दरम्यान, सकाळी किराणा, दूध, भाजीपाला घरपोच सेवा देता येतील. घाउक विक्रेत्यांना सुद्धा याच वेळेत मालाचा पुरवठा करता येईल. त्यांच्यासाठी एक वेळ निश्चित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून 20 मार्च 2020 पासून लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्प्या-टप्प्याने 31 मार्च 2021 पर्यंत त्यामध्ये वाढ होत गेली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाउन लागू केला जात आहे. हा लॉकडाउन नगपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण भागांत सुद्धा लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

काय सुरू आणि काय बंद?

 • बीड जिल्ह्यातील लॉकडाउनमध्ये सार्वजनिक खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक सुद्धा करता येणार नाही.
 • उपहारगृहे, रेस्तरॉ, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहील. केवळ कोव्हिड रुग्णांसाठी आणि इतर रुग्णांसाठी चहा, जेवणाचा पुरवठा सुरू राहील.
 • सर्व केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.
 • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, सर्व प्रकारच्या शिकवण्या बंद राहतील.
 • सार्वजनिक व खासगी वाहने, दोनचाकी, चारचाकी, तीन चाकी पूर्णपणे बंद राहील. तथापी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र, पूर्वपरवानगी आणि वैद्यकीय कारणाच्या पुराव्यासह प्रवास करता येईल.
 • सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर बंद राहतील. तरीही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थात नगरपालिका, पोलिस आणि इतरांना परवानगी दिली जाईल. सोबतच, अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना सुद्धा सूट राहील.
 • सर्व प्रकारचे बांधकाम बंद राहतील. शासकीय बांधकाम सुरू राहील. पण, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगावे लागेल.
 • सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, राजकीय इत्यादी कार्यक्रमांना बंदी राहील. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, क्लब बंद राहतील.
 • मंगल कार्यालये, विवाह समारंभ, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, स्वागत समारंभ बंद राहतील.

या गोष्टी राहतील सुरू

 • किराणा दुकांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येतील. घाउक किराणा माल विक्रेत्यांना सुद्धा याच वेळेच्या आत मालाची विक्री करता येईल.
 • दूध विक्री आणि पुरवठा सुद्धा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत करता येईल. संकलणासाठी सूट देण्यात आली आहे. दूध विक्री करताना किंवा घरोघरी वाटप करताना मास्क बंधनकारक राहील.
 • भाजीपाला व फळांच्या विक्रीसाठी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांना एका ठिकाणी न थांबता गल्लो-गल्ली फिरून सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत विक्री करता येईल.
 • सर्व वैद्यकीय सुविधा, पशूचिकीत्सा सामान्य वेळेनुसार सुरू राहतील. लॉकडाउनचा आधार घेऊन त्यांना सेवा नाकारता येणार नाही. अन्यथा कारवाई केली जाईल.
 • बँकिंगसाठी कर्मचाऱ्यांना ये-जा करण्याची परवानगी राहील. परंतु, त्यांनी बँकेचा अथवा संस्थेचा गणवेश, ओळखपत्र सोबत ठेवावा.
 • लसीकरण आणि कोरोना चाणीसाठी जाणाऱ्यांना परवानगी राहील. परंतु, त्याबाबतचा एसएमएस दाखवावा लागेल.
 • इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांना वाहनांना परवानगी राहील. जड वाहनांना सुद्धा अडवले जाणार नाही.
 • बाहेरून अर्थात इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना अँटीजेन / आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक राहील.
 • अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी 24 तास पेट्रोल पंप सुरू राहतील. घरगुती गॅस पुरवठा वाहनेही सुरू राहतील. पेट्रोल पंपांबाबतचा निर्णय त्या-त्या तहसील कार्यालयाकडून घेण्यात येईल.
 • वर्तमान पत्रांची छपाई, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया यांना परवानगी राहील. वर्तमानपत्र वितरीत करण्यासाठी सकाळी 7 ते 9 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...