आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. ३१ मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टारंट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाटभांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागरीकांच्या सोयीसाठी रात्री १० वाजेपर्यंत पार्सल सेवा ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने ३१मार्चपर्यंत बंद राहतील. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली, असून वेगाने रुगसंख्या वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. तरी, रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे.
त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य
कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. कृपया नागरीकांनी वरील त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.