आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर लक्ष:हनुमान जयंतीनिमित्त कडेकोट बंदोबस्त, बाबा पेट्रोल पंप ते खुलताबादपर्यंत पोलिस राहणार तैनात

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांत घडलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीसाठी शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात हनुमानाची जवळपास १६५ मंदिरे आहेत. या सर्व ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला जाणार असून प्रत्येक मंदिरावर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. शिवाय खुलताबादकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता बाबा पेट्रोल पंप चौक ते खुलताबादपर्यंत शहर व ग्रामीण पोलिस पावलापावलावर तैनात असतील.

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बुधवारी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेत सर्वांना सूचना केल्या. संपूर्ण शहरात बंदोबस्तासाठी विशेष पाेलिस उपमहानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, एसआरपीएफ कमांडंट निमित गोयल, उपायुक्त दीपक गिऱ्हे, शीलवंत नांदेडकर यांच्यासह पाेलिस तैनात असतील. साध्या वेशात गुन्हे शाखा, विशेष शाखेचे कर्मचारी लक्ष ठेवून असतील.

वादग्रस्त व्हिडिओ क्लिप्स, पोस्ट टाळा : पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले की, शहरात काही दिवसांत व्हिडिओ क्लिप, पोस्ट व्हायरल करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. तो व्हायरलही करू नये. तसे आढळल्यास आधी पोलिसांना कळवा. सायबर पोलिसांकडून काटेकाेरपणे सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत असून कोणीही असा प्रकार केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

असा असेल पाेलिस बंदोबस्त { दंगा काबू पथकाची एक तुकडी, तर एसआरपीएफच्या ९ तुकड्या संवेदनशील ठिकाणी असतील. शिवाय, सीआरपीएफची एक कंपनीही शहरात दाखल झाली आहे. { केवळ बाबा पेट्रोल पंप चौक ते दौलताबाद घाटादरम्यान ८ पोलिस निरीक्षक, १९ उपनिरीक्षक, १४७ कर्मचारी, ८० होमगार्ड असतील. पुढे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त राहील.