आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पैठण येथे केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शनिवारी (१० डिसेंबर) दुसऱ्या दिवशीही शहरात विविध ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी क्रांती चौक, गोपाळ टी पॉइंट, भडकल गेट आणि विद्यापीठ गेट येथे आंदोलन केले. त्याचबरोबर विविध पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात निवेदनही दिले.
राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पाटील आरतीसाठी आले होते. ते मंदिरातून बाहेर पडत असताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेतले. दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके, उपाध्यक्ष सुरेश बनसोड, महिला आघाडी शहराध्यक्षा सुभद्रा जाधव, जिल्हा समन्वयक निशांत पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
...तर दिलगिरी व्यक्त करतो
महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्यावर माझी श्रद्धा आहे. वर्गणी, सीएसआर हे शब्द तेव्हा नव्हते. भीक मागून ही संस्था उभारली हे प्रचलित वाक्य आहे. भीक या शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात फुले, आंबेडकर आहेत. - चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.