आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनप्रक्षाेभ..!:सत्य मांडणाऱ्या ‘दिव्य मराठी’विराेधात गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा राज्यभरात सर्वच स्तरांवर तीव्र शब्दांत निषेध

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘# अाय सपाेर्ट दिव्य मराठी’ या हॅशटॅगखाली व पाेलिसांच्या निषेधार्थ साेशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

काेराेना काळात प्रशासकीय यंत्रणेतील असमन्वय व विसंवाद वाचकांसमाेर अाणणाऱ्या दैनिक दिव्य मराठीविराेधात अाैरंगाबादेत गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. पाेलिसांच्या या दडपशाहीविराेधात राज्यभर संतापाची लाट उसळली अाहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय, सामाजिक संघटना व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व लाेकप्रतिनिधींनी पाेलिसांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. साेशल मीडियावर तर ‘# अाय सपाेर्ट दिव्य मराठी’ या हॅशटॅगखाली व पाेलिसांच्या निषेधार्थ प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडत अाहे. रविवारी संध्याकाळी अाैरंगाबादेतील क्रांती चाैकात काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात अाली.

‘डाॅक्टर्स, नर्स, पाेलिस यांच्याप्रमाणेच समस्त पत्रकार-छायाचित्रकारही काेराेनाच्या काळात जीव धाेक्यात घालून काम करत अाहेत. अाराेग्य, प्रशासकीय यंत्रणेतील माहिती वाचकांसमाेर अाणण्यासाठी ते धडपड करत असतात. मात्र, प्रशासनाने राज्य सरकारच्या दबावाखाली येत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नाकर्तेपणाचे लक्षण दाखवून दिले आहे. कोरोना रुग्णांना व्यवस्थित सुविधा देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. अाणि त्याविराेधात लिहिणाऱ्या पत्रकारांविराेधात कारवाई केली जात अाहे,’ याचा अाम्ही निषेध करताे असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले. भाजयुमाेचे प्रदेश सचिव तथा शहर प्रभारी राजेंद्र साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अांदाेलनात कचरू घोडके, राहुल चाबुकस्वार, अॅड. अक्षय बाहेती, पंकज साकला, महेश राऊत, तेजस व्यवहारे, राजेश मेहता, मयूर महाकाळ, विवेक होनवणे, सतीश पारखे, आकाश साळुंके, गायकवाड, दिलीप काळे आदीपदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने गुंडांप्रमाणे वागू नये
प्रशासनाने माध्यमांना त्यांचे काम करू द्यावे. प्रशासन चुकत असेल तर त्यांना बातमीतून झोडपलेच जाईल. गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावेत. अन्यथा ऑल इंडिया पँथर्स सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ऑल इंडिया पँथर्स सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी दिला अाहे.

प्रशासनाचे काम साथरोग रोखणेे : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नेते डॉ. वाल्मीक सरवदे म्हणाले, ‘प्रशासनाचे काम औरंगाबादेत साथरोग रोखण्याचे आहे. जनतेचे प्राण वाचवण्याचे काम आहे. पण अशी संवैधानिक कामे सोडून माध्यमांच्या प्रतिनिधी आणि संपादकांंवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावू नये. प्रशासन कुठे चुकते आहे, हे दाखवण्याचे काम माध्यमे करत राहतील. अधिकाऱ्यांनी त्यांची कामे नीमुटपणे करावी. लोकशाहीची गळपेची करू नये.’

शहरवासी ‘दिव्य मराठी’सोबत : काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरूण शिरसाट म्हणाले, ‘दिव्य मराठी’ पहिल्या दिवसांपासून जनतेचा आवाज बनला आहे. त्यांचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचा आवाज दाबण्यासारखे आहे. प्रशासनाने स्वत:च्या मर्यादा ओळखून रहावे. तुमच्या हातात कायदा वापरण्याचे काम आहे, म्हणून कुणावरही असले शस्र उगारू नये. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा जाहीर निषेध.’ पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. राहूल ब्राह्मणे म्हणाले, ‘सद्यस्थितीत फक्त वर्तमानपत्रे शहराची खरी बातमी लोकांपर्यंत पोहचवत आहे. त्यातल्या त्यात दिव्य मराठी अधिक आक्रमक अन् वस्तुनिष्ठपणे बातम्या देत आहे. प्रशासकीय अधिकारी फक्त टीकेचे धनी झाले म्हणून त्यांनी गुन्हे दाखल करण्याचे काम करू नये. त्वरीत कारवाई मागे घ्यावी.’

दिव्य मराठीची माफी मागा : डाॅ. उढाण : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्टुडंट्सचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण म्हणाले, ‘शहराची स्थिती हाताबाहेर चालली आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. मग, अधिकाऱ्यांवर टीका होणारच. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी माध्यमांवर गुन्हे म्हणजे, अजबच प्रकार आहे. स्वत:च्या चुका दुरूस्त करून ‘दिव्य मराठी’ची जाहीर माफी मागावी. कर्तव्य पार पाडण्याचे भान ठेवावे.’

सामाजिक कार्यकर्तेही झाले अाक्रमक
सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण म्हणाले, ‘दिव्य मराठी’ कणखरपणे बातम्या करतेय. कोरोनाचे खरे रिपोर्टिंग दिव्य मराठीतच येते आहे. कारवाई मागे घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल.’ सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड म्हणाले, ‘साथरोग नियंत्रणात आणणे सोडून भलत्याच कामात प्रशासनाला रस दिसतो आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी याच भान ठेवावे. सामान्य जनता रस्त्यावर उतरली तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. कारवाई मागे घ्या.’
६ हजारांच्या घरात आहे. २५ मार्चपासून सलून, ब्युटी पार्लर बंद असल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली होती. राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे नाभिक समाज तसेच सलून व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थी लक्षात घेऊन तयारीही व्यावसायिकांनी केली होती. यासाठी पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर तसेच थर्मलगन आणि ऑक्सिमीटर याची खरेदीही केली. रविवारी सकाळी उत्साहातच सुरुवात केली. मात्र, दोनच तासांत बजरंग चाैक, राेपळेकर चाैक, सिडकाे अादी भागांत फिरून पाेलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही ठिकाणी वादही झडले.

अाज पत्रकार संघटना घेणार विभागीय आयुक्तांची भेट
प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार प्रशासनाने सुरू केला आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा. यासाठी औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघाचे शिष्टमंडळ सोमवारी दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळून निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनोद काकडे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना कळवणार ‘दैनिक दिव्य मराठी’ने वस्तुस्थिती मांडली आहे. तरीसुद्धा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करणे हा काही यावरचा पर्याय असू शकत नाही. महाविकास आघाडीचे सरकार वृत्तपत्र आणि माध्यमांचे स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणारे सरकार आहे. त्यामुळे दैनिक दिव्य मराठीवर प्रशासनाने जे गुन्हे दाखल केले आहेत त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना या सर्व प्रकाराची माहिती देणार आहे. - अर्जुन खोतकर, माजी राज्यमंत्री.

प्रशासनाने गुंडांप्रमाणे वागू नये प्रशासनाने माध्यमांना त्यांचे काम करू द्यावे. प्रशासन चुकत असेल तर त्यांना बातमीतून झोडपलेच जाईल. गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत. अन्यथा ऑल इंडिया पँथर्स सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ऑल इंडिया पँथर्स सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी दिला अाहे.

हा तर अापली चूक झाकण्याचाच प्रकार सत्य परिस्थिती मांडणे आणि प्रशासनातील त्रुटी लक्षात आणून देणे हे माध्यमांचं काम आहे. एखादे माध्यम जर असे काम करत असेल तर प्रशासनाने त्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे. या त्रुटी दूर केल्या तर परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य होईल. मात्र,औरंगाबाद प्रशासनाने तसे न करता दैनिक दिव्य मराठीवर गुन्हे दाखल केले आहेत. यातून प्रशासनाने आपल्या चुका झाकण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे असे गुन्हे दाखल करणे हे योग्य नाही. - रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री.

साेशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाजप, शिवसेना, युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना, एमआयएम, संभाजी ब्रिगेड, मनसे शेतकरी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट असोसिएशन, प्रहार संघटना अादींनी दिव्य मराठीला पाठिंबा व प्रशासनाचा निषेध करणारी पत्रके साेशल मीडियावर प्रसिद्ध केली, दिव्य मराठीलाही पाठवली अाहेत. माजी नगरसेवक गाैतम खरात म्हणाले, ‘माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. गुन्हाच जर दाखल करायचा असेल तर काेराेना राेखण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल.’

मनसे, रिपब्लिकन सेना, प्रहार संघटना दिव्य मराठीसाेबत प्रसारमाध्यमांवर गुन्हा दाखल करणे हे प्रशासनाला शोभणारे नाही. माध्यमांनी वास्तव समाेर आणले आहे. ‘दिव्य मराठी’चे याबाबतीत अभिनंदन. आम्ही कायम या लढाईत आपल्यासोबत आहोत. आता तरी प्रशासनाने गांभीर्याने कोरोना आणि इतर वाढत्या समस्यांवर लक्ष द्यावे, असे मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सांगितले. ‘अशा भ्याड कारवाईने माध्यमे घाबरत नसतात. प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. संपादक आणि पत्रकारांवर केलेली कारवाई मागे घ्यावी. रिपब्लिकन सेना ‘दिव्य मराठी’सोबत आहे,’ असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार या संघटनेचे पदाधिकारी रवी लिंगायत, सतीश हिवराळे, शिवप्रसाद पगार, मुन्ना मावस्कर, दिनेश हडकर, संदीप बुवा, धम्मा वाघ, मानव साळवे, राेहन शेजूळ अादींनी दिव्य मराठी कार्यालयात येऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

भाकपतर्फे निषेध कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासन कमी पडले अाहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिव्य मराठीने समाेर अाणल्यामुळे जनतेने त्यांचे काैतुक केले. या बातमीमुळे पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात कशी करता येईल यावर विचारमंथन करण्याऐवजी दिव्य मराठीवर गुन्हा दाखल केला, याचा अाम्ही निषेध करताे. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भाकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. राम बाहेती, जिल्हासचिव कॉ. अशपाक सलामी, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने, जिल्हा सहसचिव कॉ. अभय टाकसाळ, शहर सहसचिव कॉ. मधुकर खिल्लारे, जिल्हा सहसचिव कॉ. तारा बनसोडे, शहर सहसचिव कॉ. वसुधा कल्याणकर यांनी केली अाहे. नुमाईंदा काैन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दिकी यांनीही प्रशासकीय दडपशाहीचा निषेध केला. निर्भीड पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न निंदनीय असल्याचे जमाते इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष इंजिनिअर वाजेद कादरी यांनी दिली.

‘दिव्य मराठी’विराेधात गुन्हा दाखल करणाऱ्या पाेलिस प्रशासनाविराेधात भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अाैरंगाबादेतील क्रांती चाैकात निदर्शने केली.

बातम्या आणखी आहेत...