आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागाने शाळांची संच मान्यता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांसाठी ३० एप्रिलपर्यंत स्टुडंट्स पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे अनिवार्य केले आहे. मात्र, अद्यापही ४३,८२० विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदवलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
आधार नोंदणी अनिवार्य
शासनाकडून विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता करण्यात येते. मात्र, काही शाळांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षकांची पदे भरल्याचे समोर आल्याने शासनमान्य सर्व शाळांना विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यानुसार शाळांमध्ये संच मान्यता करण्यात येणार आहे.
त्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवण्याचे आदेश दिले होते. विभागातील सुमारे २५ लाख ८,३३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी स्टुडंट पोर्टलवर करणे शाळांना बंधनकारक केले आहे. त्यानंतरही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील सुमारे ४३,८२० विद्यार्थ्यांची आधार अपडेट केले नाही.
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे स्थलांतर
शासन धोरणानुसार किमान २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी आकडेमोड केल्यास विभागातील किमान २,१९१ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे अनेक विद्यार्थी पालकांबरोबर स्थलांतरित, तर काही परगावी गेले आहेत. त्यांचे आधार कार्ड उपलब्ध होत नसल्याने अपडेटचे काम रखडले आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.