आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे गेली १० महिने रिकामे राहिलेल्या होस्टेलमध्ये जानेवारीपासून विद्यार्थी परतण्यास सुरुवात झाली. मार्चमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकेत मिळत अाहेत. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वसतिगृहातून विद्यार्थी गावी परतण्यास सुरुवात झाली अाहे. सध्या १० टक्के विद्यार्थीच होस्टेलमध्ये आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी औरंगाबादला येतात. शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. औरंगाबादच्या शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालय परिसरात कंदी होस्टेल, गुरूदेव होस्टेल आणि पाठक होस्टेल आहेत. यातून सुमारे ५०० विद्यार्थी राहतात. गेल्या वर्षी लॉकडाऊनचे स्वरूप माहिती नसल्याने विद्यार्थी निश्चिंत होते. होस्टेलमध्ये मेसची सोय असल्याने जेवणाची आबाळ टळली. मात्र, गावी परतण्यासाठी अनलॉकची वाट बघावी लागली. डिसेंबरपर्यंत होस्टेल रिकामेच हाेते.
कंदी होस्टेलमध्ये सरासरी १३५ ते १५० विद्यार्थी राहतात. मार्चमध्ये रूग्ण वाढू लागले आणि दुसऱ्या आठवड्यापासून मुले गावी परतण्यास सुरूवात झाली. अनलॉकनंतर परतलेल्या ६५ पैकी फक्त ६ विद्यार्थीच उरल्याची माहिती कंदी होस्टेलचे संचालक शुभम कंदी यांनी दिली. हडको एन-११ येथील श्रीविद्या होस्टेलमध्ये लॉकडाऊन आधी १२० विद्यार्थी होते. अनलॉकमध्ध्ये ३५ परतले. सध्या ५ विद्यार्थी असल्याचे संजय पवार म्हणाले. ज्याेतीनगरातील १५० क्षमतेच्या मुलींच्या होस्टेलमध्ये अनलॉकनंतर केवळ २० मुली अाल्या होत्या. त्या सर्वच अाता गावी गेल्या उल्कानगरीतील एका घरात १० मुली पेईंग गेस्ट म्हणून रहायच्या. अनलॉकनंतर ४ जणी परतल्या. लॉकडाऊनच्या भीतीने अाता सर्व गावी गेल्या आहेत.
पालक रिस्क घेण्यास तयार नाहीत
आमच्या होस्टेलमध्ये जीम, मेस आणि स्टेशनरी साहित्याच्या दुकानाची सोय आहे. लाॅकडाऊन लागला तरी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. मात्र, पालकांना मागील वर्षीचे अनुभव असल्याने ते मुलांना ठेवण्यास तयार नाहीत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच मुले गावी परतू लागली. - शुभम कंदी, संचालक, कंदी होस्टेल, पीरबझार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.