आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:देवगिरी कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थिनीने घेतला गळफास, अडीच पानांची सुसाइड नोट, नैराश्यातून उचलले टाेकाचे पाऊल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मला खूप मोठे व्हायचे आहे, परंतु मला नाही वाटत पुढची तीन वर्षे माझी पूर्ण होतील. सर्व मुलींनी चांगलं राहावं, मला आता जड जातंय सगळं, अलविदा...’ अशी चिठ्ठी लिहून आरती सर्जेराव कोल्हे (२०) या विद्यार्थिनीने देवगिरी महाविद्यालयाच्या जिजाऊ होस्टेलमध्ये गळफास घेतला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना समोर आली.

मूळ घनसांवगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथील शेतकरी कुटुंबातील आरतीने देवगिरी महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षाला प्रवेश घेतला हाेता. गुरुवारी दिवसभर ती मैत्रिणींसाेबत हाेती. रात्री सोबत जेवण केले. रोज १२ वाजता क्लासला जाणारी आरती सायंकाळी सहा वाजेपर्यंत होस्टेलवर परतायची. शुक्रवारी मैत्रिणी क्लाससाठी निघाल्या, परंतु आरतीने नकार देत ‘तुम्ही पुढे जा’ असे सांगितले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती क्लासला गेलीच नाही. मैत्रिणी खोलीवर परतल्यावर आरती दरवाजा उघडत नव्हती. घाबरलेल्या मैत्रिणींनी होस्टेलच्या अधिकाऱ्याला सांगितले. त्यांनी धाव घेत दरवाजा जोरात ढकलला असता आरतीने भगव्या शालीने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे यांनी धाव घेत आरतीला फासावरून उतरवून घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आरतीच्या खोलीची पाहणी केली तेव्हा पायाखालीच रजिस्टरमध्ये काही पानांवर तिने लिहिलेला मजकूर आढळला. त्यापैकी अर्ध्या पानावर आत्महत्येच्या अनुषंगाने, तर उर्वरित आयुष्याविषयी लिहिलेले दिसेल. ‘मला खूप मोठे व्हायचेय, पण मला वाटत नाही पुढची तीन वर्षे पूर्ण होतील. सर्व मुलींनी चांगलं राहावं, मला आता सगळंच जड जातंय, अलिवदा,’ असे लिहिले हाेते. दोन पानांमध्ये आयुष्य खूप सुंदर आहे, अशी सुरुवात करून आयुष्यात ती कशी जगली, कसे जगावे, असा संदर्भ देत नैराश्यात गेल्याचे सांगितले. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली. घटनेमुळे होस्टेलमधील मुली प्रचंड घाबरल्या होत्या.

मामा म्हणतात, पोरगी पंचवीस दिवसांत कशी नैराश्यात जाईल? :तिचे वडील शेतकरी असून आई, एक विवाहित बहीण, लहान बहीण व भाऊ आहे. घटनेनंतर रांजणगावात राहणाऱ्या तिच्या मामांनी घाटीत धाव घेतली. नुकत्याच झालेल्या राखीपौर्णिमेला ती भावांना राखी बांधण्यासाठी त्यांच्याकडे गेली होती. मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी होस्टेलवर परतली. तीन दिवसांपूर्वीच तिची आई, आजी होस्टेलवर भेटण्यासाठी आल्या होत्या. घाटीत तिचा मृतदेह पाहून मामाला अश्रू अनावर झाले. २५ दिवसांत पोरगी नैराश्यात कशी जाईल, आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न ते सतत विचारत होते.

बातम्या आणखी आहेत...