आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी स्थलांतर मोठी समस्या:शिक्षण विभाग साधणार पालकांसोबत संवाद, 2018-19 मध्ये रोखले होते 3200 मुलांचे स्थलांतर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिकसह माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ नये. ते नियमित शाळेत यावेत. यासाठी आता पालकांशी संवाद साधून त्यांचे स्थलांतर रोखण्याबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

तसेच पालक जर कामानिमित्त स्थलांतरित होत असले तर मुलांची गैरसोय होवू नये. यासाठी उपाय केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी ऑक्टोबर पासूनच ऊसतोड कामगार, विटभट्टी असो वा इतर काही कामांच्या निमित्ताने विभागातून जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिक हे कामाच्या शोधात स्थलांतरीत होतात. गेल्या दोन वर्षात तर कोरोनामुळे रोजगार गेलेले आणि काममुळे स्थलांतरित झालेले काही पालक मुलांसह गेले ते अजूनही परत आलेले नाहीत.

हंगामी वसतीगृहांसाठी प्रस्ताव

अशात आता पुन्हा स्थलांतरास सुरुवात होईल. त्यापूर्वीच शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये. त्यांचे शिक्षण थांबता कामा नये. या उद्देशाने गेल्या दोन वर्षात हंगामी वसतीगृह सुरु नव्हते. परंतु आता परिस्थिती निवळल्याने पुन्हा हंगामी वसतीगृहांसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असून, औरंगाबाद जिल्हयात सोयगाव, मधील काही भाग,पैठण, खुलताबाद, कन्नड येथून अधिक लोकांचे स्थलांतर होत असते.

शिक्षण विभागातील अधिकारी साधणार संवाद ​​​​​​

वपालक स्थलांतरीत होत असल्याने बऱ्याचवेळा मुलंही त्यांच्या सोबत जातात. त्यामुळे हे मुलांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी काही व्यवस्था करता येतील का या हेतूने उपाययोजना करण्यात येत आहे. ज्या ठिकाणाहून हे स्थलांतर होते तेथील पालक त्यांचे नातेवाईक यांच्याशी शिक्षण विभागातील अधिकारी संवाद साधुन उपाय करणार आहेत. तसेच या काळातील शालेय पोषण आहार देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

गरजेनुसार हंगामी वसतीगृह

ऑक्टोबर नंतर मोठ्या प्रमाणात कामासाठी पालक स्थलांतर करतात. त्यामुळे मुलांचे देखील नुकसान होते. ही बाब लक्षात घेवून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी मुलांच्या सुरक्षेसह शिक्षकांनी देखील जबाबदारी पार पाडत या मुलांचे स्थलांतर रोखावे. म्हणून त्यांच्या पालकांशी बैठक घेवून संवाद साधणार आहोत. तर मुल मोठी असले तर कामयोग्य असल्याने ती मुलेही पालकांसोबत जातात. त्यामुळे अशा मुलांसह त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाईल. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...