आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड:‘सीडबॉल’ कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ; जवळपास 6 हजार वृक्ष लागवड

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानपुरा येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर सीडबॉल कार्यशाळा झाली. वेगवेगळ्या २० प्रकारची औषधी, फळझाडे, नैसर्गिकरीत्या संवर्धन केलेले बियाणे या कार्यशाळेत सीडबॉलमध्ये वापरण्यात आले. यात पळस, चिंच, शेवगा, हादगा, भोकर, कडुनिंब आदी नैसर्गिकरीत्या संवर्धन केलेले आणि कमी पाण्यात वाढणारे जवळपास ६ हजार बियाणे सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी वापरण्यात आले. प्रभंजन महातोले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुधीर चापते, अक्षय रासकटला, जानकीराम नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. रमेश जाधव, वीरेन लोढा, प्रदीप शर्मा, संजय भालेकर आदींची या वेळी उपस्थिती होती. बीजामृतचे बीज संस्कार करून घेतले. माती आणि व्यवस्थित कुजलेले शेणखत एकत्र करून सीडबॉल बनवून त्यात २० प्रकारचे बियाणे टाकून बॉल तयार केले. शहरातील रिकाम्या जागेत, हे बॉल टाकण्यात आले. जवळपास ६ हजार वृक्ष लागवड यातून करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...