आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 टक्के मुलींची पसंती स्टेनो ट्रेडला:आयटीआय प्रवेशात पारंपारिक ट्रेडलाही विद्यार्थ्यांची पसंती

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिकी शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज निश्चितीसाठीची प्रक्रिया सुरु झाली असून, पारंपारिक असलेल्या वेल्डर, हिटर, फिटर, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन आणि इलेक्ट्रिकल या ट्रेडचे महत्त्व कायम असून, मुलींमध्ये 50 टक्के विद्यार्थीनींची पसंती ही स्टेनोला असल्याचे आयटीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहावीचा निकाल जाहिर झाल्यामुळे आता त्या पुढील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्र्रक्रियेला वेग आला आहे. पारंपारिक अकरावी, पॉलिटेक्निक यासह ग्रामीण भागासह शहरातून आयटीआयलाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेतात.

आयटीआयमध्येही प्रवेश नोंदणी सुरु झाली असून, या नोंदणीमध्ये वेल्डर, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन आणि इलेक्ट्रिकल या पारंपारिक ट्रेडची पसंतीही विद्यार्थ्यांमध्ये कायम आहे. उद्योग क्षेत्रातूनही या ट्रेडमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने हे ट्रेड पूर्ण होताच मुलांना रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते. तर मुलींमध्येही आता वेगळे ट्रेड निवडयाचा बदल दिसतो आहे. मेकॅनिकल, इलेट्रिशियन यासह स्टेनो या ट्रेडला 50 टक्के मुलींची पसंती असल्याचे प्राचार्य अभिजित आलटे यांनी सांगितले.

असे आहेत ट्रेड आणि क्षमता -

  • एकूण ट्रेड 30
  • प्रवेशासाठी उपलब्ध युनिट 52
  • प्रवेश क्षमता 1128

मुलींसाठी आयटीआयमध्ये चांगले ट्रेड उपलब्ध आहे. आता पारंपारिक ट्रेडऐवजी मुली देखील वेगळे ट्रेड निवडण्यास पसंती देत असून, कंपन्यांमध्ये पर्सनल आणि असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर स्टेनोच्या चांगल्या संधी मिळतात. यासह न्यायालय, मंत्रालय येथेही स्टोनोच्या जागा असतात. औरंगाबादमध्ये मराठी, इंग्रजी यासह सेक्रेटरीयल प्रॅक्टीस हे स्टेनोमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मुली स्टेनोला पसंती दर्शवितात असे माजी प्राचार्य एस.एम. शेख आणि औरंगाबाद आयटीआयचे एस.पी. नागरे यांनी सांगितले.