आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात:विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 24 जून ते 7 जुलै दरम्यान ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील विभागातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार, दि. 24 जून म्हणजे आजपासून सुरूवात होणार आहे. विभागातील चार शाखांमध्ये 2 हजार 364 जागा रिक्त आहे. विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असणार असून ही ऑनलाइन नोंदणी विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळावर आजपासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश गायकवाड यांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या 2022 -23 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचे बारीक लक्ष आहे. यंदा विभागातील चार शाखांमध्ये 2 हजार 364 जागा रिक्त आहे. या रिक्त जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी कुलगुरूंनी डॉ. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश प्रक्रिया समिती स्थापन केली आहे. या समितीने (दि.8) जून रोजी प्रवेश प्रक्रियेचे वेळापञक जारी केले आहे. या वेळापञकानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 24 जून ते 7 जुलै दरम्यान ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 5 जुलै ते 15 जुलै दरम्यान शैक्षणिक माहीती भरता येणार आहे. 6 ते 18 जुलै अर्ज छाणणी प्रक्रीया समांतर पद्धतीने होणार आहे. त्यातील आक्षेपांसाठी 20 ते 20 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार इतर राज्य व इतर विद्यापीठाच्या प्रत्येकी दहा टक्के जागांसाठी प्रवेश 28 जुलै रोजी होणार आहे. त्यानंत 4 शाखेतील रिक्त जागांसाठी 30 जुलै ते 1 ऑगस्ट रोजी प्रवेश प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रत्येक विभागात स्पॉट अ‌ॅडमीशनची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासंदर्भातील यादी 3 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून 7 ऑगस्टपर्यंत स्पॉट अ‌ॅडमीशनची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली आहे.

शाखानिहाय रिक्त जागा -

विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा - 837

वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा - 240

मानवविज्ञान शाखा - 990

आंतरविद्या शाखा - 297

एकूण - 2364

बातम्या आणखी आहेत...