आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंतांचा सत्कार:विद्यार्थ्यांनो, तुमच्या आवडीचे करिअर निवडा; पालकांनो, आपली मते मुलांवर लादूच नका

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावी करिअर निवडीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष आहे. आपला पाल्य दहावी िकंवा बारावीत असेल तर पालकांना त्यांच्या करिअरची माेठी चिंता असते. परंतु, पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर न लादता त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. दहावी, बारावीनंतर कुणी वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्र निवडतात. म्हणून आपणही तेच न निवडता आपल्या पाल्यांच्या आवडीतून करिअरची संधी निवडावी, असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार साेहळ्यात दिला.दै. दिव्य मराठी, एमजीएम विद्यापीठातर्फे शनिवारी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलपती अंकुशराव कदम, डॉ. आशिष गाडेकर, दै. दिव्य मराठीचे सॅटेलाइट हेड सुभाष बोंद्रे, युनिट हेड बेंजामिन रॉक, माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलचे अभिजित छाजेड, रिलायबलचे संचालक धनंजय आकात, अल्फा पीसीबीचे संचालक यशवंत चव्हाण, ए. के. फिजिक्सचे संचालक सचिन कवडे, प्रभात नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बकाल, डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना प्रमाणपत्र, पुष्प आणि मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.

छाजेड यांनी दहावी-बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील संधींची माहिती दिली. चव्हाण यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे सांगितले. बकाल म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. आकात यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगले करिअर घडवता येते. त्यामुळे पालकांनी आपली मते मुुलांवर लादू नयेत. कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, जो अभ्यास कराल, त्यातील ज्ञान आत्मसात करा. नव्या बदलानुसार मुलांना तयार करताना शिक्षणाच्या पद्धतीतही बदल करावे लागतील, असे डॉ. येवले म्हणाले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूल, अल्फा पीसीबी, ए. के. फिजिक्स, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रभात नागरी सहकारी पतसंस्था आदी होते.

तंत्रज्ञानामुळे अनेक संधी
कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, आज तंत्रज्ञानामुळे मुलांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी आंतरविद्याशाखीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. यातून ज्ञान आत्मसात करत स्वत:चे स्टार्टअपही सुरू करू शकता. त्यासाठी आपली आवड ओळखून दिशा निवडण्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...