आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्हीपासून सुरक्षित राहा, एड्स टाळा अशा प्रकारचे संदेश गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीतून देण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातूनही जनजागृती केली.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा यांच्या वतीने क्रांती चौक येथून एचआयव्ही, एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता पाटील, सहायक उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके व डॉ. सिराज बेग यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या वेळी रॅली डॉ. पद्मजा सराफ, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. गणेश कल्याणकर, डॉ. मनीषा भोंडवे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार उपस्थित होते. रॅलीत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. या वर्षी आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांंकरिता या थीमवर घोषवाक्याचे फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. या वेळी एमजीएम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रण कार्यात सहभाग घेण्याचे व संसर्गित व्यक्तीची काळजी घेण्याची शपथ दिली.

बातम्या आणखी आहेत...